शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा; अखेर सशर्त जामीन मंजूर 
मुंबई

Mumbai : शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा; अखेर सशर्त जामीन मंजूर

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शीतल तेजवानीला अखेर उच्च न्यायालयाने दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शीतल तेजवानीला अखेर उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकलपीठाने तेजवानीची खडक पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात २ लाखांच्या हमीपत्राच्या जामिनावर सुटका केली. यापूर्वी न्यायालयाने पोलिसांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवत दोन प्रकरणात करण्यात आलेली अटक बेकायदा ठरवत दोषमुक्त केले आहे.

मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीला ३ डिसेंबर रोजी अटक केली. त्याच प्रकरणात पिंपरी आणि बावधन या दोन्ही पोलीस ठाण्यांतील दाखल दोन वेगवेगळ्या एफआयआरमध्ये पुणे पोलिसांनी शीतल तेजवानी यांना केलेली अटक बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने त्यांच्या तत्काळ सुटकेचे आदेश एप्रिल महिन्यात दिले.

त्यानंतर शीतल तेजवानी यांच्या वतीने ॲड. दीपाली केदार यांच्यामार्फत खडक पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणी रितसर जामिनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकीवर न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने २ लाखांच्या हमीपत्राच्या जामिनावर सुटका केली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तेजवानी हिचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले