मुंबई : मुंबईत पार पडलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ आरक्षण सोडतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडील बहुतांश महिला नगरसेवकांना आपले वॉर्ड राखण्यात यश आले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजपला १२७ जागा मिळाल्या तर त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ६० जागांवर यश मिळाले. त्यामुळे महायुतीत शिंदे सेना दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. यात शिंदे सेनेच्या महिलांनी आरक्षण सोडतील वॉर्ड राखले आहेत. वॉर्ड क्रमांक १८६ आणि वॉर्ड क्रमांक १५५ अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित झाला असून या दोन्ही ठिकाणी उबाठा गटाचे विद्यमान नगरसेवक आहेत. (वॉर्ड क्र १८६ - वसंत नकाशे, वॉर्ड क्र १५५ श्रीकांत शेट्ये) दोन्ही वॉर्ड अनुसुचित महिलांसाठी राखीव झाल्याने उबाठाला गटाला आरक्षणाचा फटका बसल्याचे दिसून येते. याउलट शिवसेनेकडील विद्यमान नगसेविका समृद्धी काते यांचा वॉर्ड क्र. १४६ यांचा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. अंजली नाईक यांचा वॉर्ड क्र. १४७ हा यंदाच्या निवडणुकीसाठी अनुसुचित महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर उपेंद्र सावंत यांचा वॉर्ड ११६ हा अनुसुचित जातीमधील महिलेसाठी राखीव झाला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवलेल्या वॉर्ड क्रमांक ५३ आणि वॉर्ड क्रमांक १२१ मधील विद्यमान नगरसेविका शिवसेनेच्या आहेत. वॉर्ड क्रमांक ५३ मध्ये रेखा रामवंशी आणि वॉर्ड क्रमांक १२१ मध्ये चंद्रावती मोरे शिवसेनेत आहेत. तर ओबीसी महिलांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार ५ वॉर्डामध्ये शिवसेनेच्या विद्यमान महिला नगरसेविका आहेत.
वॉर्ड क्रमांक ११ रिद्धी खुरसुंगे, वॉर्ड क्रमांक १२ गीता सिंघल, वॉर्ड क्रमांक १८ संध्या दोशी, वॉर्ड क्रमांक ११७ सुवर्णा कारंजे आणि वॉर्ड क्रमांक १२८ अश्विनी हांडे, या विद्यमान महिला नगरसेविका शिवसेनेत आहेत. तर उबाठाकडील विद्यमान नगरसेवक वॉर्ड क्रमांक १५३ अनिल पाटणकर यांचा हा वॉर्ड ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाला आहे.
एकूणच मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर झाली, त्यात एकनाथ शिंदे यांच्या महिलांना वॉर्ड राखण्यात यश मिळाले आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ठाकरेंच्या शिवसेनेचे ४६, काँग्रेस - ७, राष्ट्रवादी काँग्रेस - ५, मनसे १, एमआयएम - २, समाजवादी पक्ष - २ असे ६१ माजी नगरसेवक शिंदे सेनेत असल्याने त्यांची आगामी निवडणुकीत ताकद वाढली आहे.