मुंबई

डहाणू-विरार रेल्वे चौपदरीकरणासाठी २५४३८ कांदळवनाची कत्तल ;मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

दुसऱ्या बाजुला उपनगरी प्रवाशांची संख्या सतत वाढत असून ज्यादा गाड्यांची मागणी वाढत आहे

उर्वी महाजनी

मुंबई: मंगळवारी मुंबइ उच्च न्यायालयाने विरार-डहाणू रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी २५४३८ कांदळवनतोड करण्यास सशर्थ परवानगी दिली. त्या बदल्यात पश्चिम रेल्वेने वनीकरण करायची अट घालण्यात आली आहे.

न्यायमूर्ती के आर श्रीराम आणि न्या. नीला गोखले यांनी भारत सरकारच्या याचिकेवर सुनावणी देतांना ही परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने सध्याचा रेल्वेमार्ग लांब पल्ल्याच्या गाड्या, मालगाड्या, आणि उपनगरी गाड्यांमुळे गच्च भरुन गेला आहे. त्या मार्गाची १०० टक्के क्षमता वापरात आली असल्यामुळे येथे उमनगरी सेवा गाड्यांची संख्या वाढवणे शक्य नाही.तेव्हा चौपदरीकरणाची गरज आहे हे सरकारने न्यायालयाला पटवून दिले. दुसऱ्या बाजुला उपनगरी प्रवाशांची संख्या सतत वाढत असून ज्यादा गाड्यांची मागणी वाढत आहे. म्हणून कांदळवनाची छाटणी करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजप कार्यालय जाळलं, ४ जणांचा मृत्यू, कर्फ्यू लागू

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

Mumbai Metro: सर्व मेट्रो तिकिटासाठी आता एकच ॲप; एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गांसाठी तिकिटे खरेदी करता येणार