मुंबई

आरोग्य विभागाच्या बेटी बचाव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

समाजात मुलीचे महत्व वाढण्यासाठी बेटी बचाव या विषयावर आधारित नाट्य सादर करण्यात आले.

नवशक्ती Web Desk

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागातील आरोग्य विभाग व लोकसेवा समर्पण समाजिक ट्रस्ट यांच्या वतीने नवरात्री उत्सव २०२३ साजरा करण्यात आला. नव युगात महिला सर्वच ठिकाणी अग्रगन्य् व प्रगती पथावर आहेत. प्रभादेवी म्यूनीसीपल स्कूल येथे नवरात्री उत्सव सोहळा निमित्त जी दक्षिण आरोग्य विभाग आरोग्य अधिकारी डॉ. विरेंद्र मोहिते यांच्या वतीने व लोकसेवा समर्पण समाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजात मुलीचे महत्व वाढण्यासाठी बेटी बचाव या विषयावर आधारित नाट्य सादर करण्यात आले. जी/ दक्षिण विभागामार्फत लोकसेवा समर्पण सामाजिक ट्रस्टला उत्कृष्ठ संस्था म्हणून सन्मानित करण्यात आले. ह्या कार्यक्रमास महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. शीला जगताप, डॉ. उपालिमित्रा वाघमारे यांसह मान्यवर उपस्थित होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत