X
मुंबई

लोडर भरतीच्या २२०० जागांसाठी २५ हजार उमेदवार; विमानतळावर चेंगराचेंगरीचा अनर्थ टळला

Swapnil S

मुंबई : उच्च शिक्षण घेऊनही नोकरीसाठी वणवण फिरावे लागते. त्यामुळे सद्यस्थितीत जी नोकरी मिळेल तिकडे तरुण उमेदवार धाव घेतात. मुंबई विमानतळावर २,२१६ जागांसाठी लोडरची भरती निघाली. आपल्याला नोकरी मिळेल, या आशेने तब्बल २५ हजार उमेदवार विमानतळाच्या ठिकाणी पोहोचले. अनपेक्षित गर्दीमुळे चेंगराचेंगरीची भीती निर्माण झाल्याने मुंबई विमानतळ प्राधिकरणाची ही धावपळ उडाली. याठिकाणी उमेदवारांसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध नसल्याने तसेच नियोजनाचा बोजवारा उडाल्याने हा प्रकार घडल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

देशात महागाई आग ओकत आहे. त्यात रोजगार उपलब्ध होत नसल्याने नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याचे कळताच, त्याठिकाणी उमेदवारांची एकच गर्दी होते. भविष्यात चांगली नोकरी मिळेल, या आशेने तरुण पिढी उच्च शिक्षण घेते.

मात्र शिक्षणाच्या तुलनेत नोकरी उपलब्ध होत नाही. त्यामुळे मिळेल तिकडे नोकरीसाठी उमेदवार धाव घेतात. मुंबई विमानतळावर लोडरच्या २२१६ जागांसाठी २५ हजारांहून अधिक उमेदवार मंगळवारी मुलाखतीसाठी पोहोचले. मात्र अचानक इतक्या उमेदवारांची गर्दी झाल्याने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. उमेदवारांच्या गर्दीचे अनेक फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये नोकरीसाठी येणाऱ्या तरुणांची मोठी गर्दी दिसत आहे. फॉर्म काउंटरवर पोहोचण्यासाठी उमेदवार एकमेकांशी धडपड करत होते.

नोकरी मिळेल या आशेने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना तासन् तास रांगेत उभे रहावे लागले. या ठिकाणी व्यवसापनाकडून अन्न-पाणी अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे अनेकांची प्रकृती ढासळू लागली. बुलढाणा जिल्ह्यातील प्रथमेश्वरने सांगितले की, “लोडरच्या नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी ४०० किलोमीटरचा प्रवास करून इथे पोहोचलो. मी शिकाऊ पदासाठी अर्ज करण्यासाठी आलो आहे. मी बीबीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. पण नोकरी लागली तर तो अभ्यास सोडेन. सरकारने रोजगाराच्या संधी वाढवाव्यात.”

२५ ते ३० हजार पगारासाठी धडपड

विमानतळ लोडरचा पगार २० ते २५ हजार रुपये प्रति महिना असतो. तथापि, बहुतेक लोडर जादा काम करून ३० हजार रुपयांपेक्षा जास्त कमावतात. लोडरच्या नोकरीसाठी, शैक्षणिक पात्रता मूलभूत आहे तर उमेदवार शारीरिकदृष्ट्या मजबूत असावा लागतो.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था