मुंबई

विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

कार्यक्रमात एकूण १९० गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले

नवशक्ती Web Desk

मुंबई : शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १४ तर्फे जनता केंद्र, ताडदेव येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. विभागप्रमुख दिलीप नाईक यांच्‍या हस्ते भेटवस्‍तू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सही असलेले प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दहावीत ९९.४० टक्के मिळवून दक्षिण मुंबईतून प्रथम आलेली चैताली दीपक राणे हिला लॅपटॉप तसेच १२वीला ९१ टक्के मिळून प्रभागातून प्रथम आलेली मानसी अशोक सांगळे हिला टॅब भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात एकूण १९० गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी