(प्रातिनिधिक छायाचित्र)
मुंबई

मुलुंडमध्ये भुयारी मार्गाचा प्रस्ताव गुंडाळला; ३० कोटी खर्च करून नवीन स्कायवॉक उभारणार

मुलुंडच्या लालबहादूर शास्त्री मार्गावरील महाराणा प्रताप चौकात पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने गुंडाळला

Swapnil S

मुंबई : मुलुंडच्या लालबहादूर शास्त्री मार्गावरील महाराणा प्रताप चौकात पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने गुंडाळला आहे. याठिकाणची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता भुयारी मार्गाचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, आता पादचाऱ्यांसाठी स्कायवॉक बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून यासाठी पालिका ३० कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुलुंडमधील एसीसी सिमेंट कंपनी रोड, दिनदयाळ उपाध्याय रोड व शांताराम चव्हाण रोड यांना जोडणाऱ्या चौकाला महाराणा प्रताप चौक असे ओळखले जाते. या चौकालगतच महापालिकेची शाळा व बेस्ट बस डेपो असल्याने पादचाऱ्यांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसह पादचाऱ्यांना या चौकातून रस्ता ओलांडणे जिकीरीचे झाले आहे. पादचाऱ्यांसह विद्यार्थी व पालकांना होणारा त्रास आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही याठिकाणी भुयारी मार्ग बनविण्याची मागणी केली जात होती. मात्र येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता भुयारी मार्गाचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, तांत्रिक सल्लागाराने नव्याने बांधण्यात येणाऱ्या स्कायवॉकचा सविस्तर अंदाज खर्च तयार केला. या आराखड्याला एमएमआरडीएचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या पूल विभागाने त्यासाठीची निविदा मागवली. या निविदेत मेसर्स ए. बी. इन्फ्राबिल्ड लि. ही कंपनी पात्र ठरली. या स्कायवॉकच्या बांधकामासाठी २४ कोटी २ लाख २४ हजार रुपये खर्च केले जातील. विविध करांसह ३० कोटी १ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. पावसाळा धरून पुढील दोन वर्षांमध्ये या स्कायवॉकचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

स्कायवॉकची वैशिष्ट्ये

- पुलाची लांबी : ४५१ मीटर

- पुलाची रुंदी : ३ मीटर

- पिलरची संख्या : १९

- स्पॅनची संख्या : १९

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी