मुंबई

Mumbai : तानसा धरणाची सुरक्षा अधिक भक्कम; धरण परिसरात फेन्सिंगचे जाळे, पालिका २६ लाख रुपये खर्च करणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणापैकी तानसा धरण. धरण क्षेत्र परिसरात प्रवेश बंदी असूनही बेकायदा प्रवेश रोखण्यासाठी आता धरण परिसरात फेन्सिंग बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पालिका प्रशासन तब्बल २६ लाख ५० हजार २५३ रुपये खर्च करणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणापैकी तानसा धरण. धरण क्षेत्र परिसरात प्रवेश बंदी असूनही बेकायदा प्रवेश रोखण्यासाठी आता धरण परिसरात फेन्सिंग बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पालिका प्रशासन तब्बल २६ लाख ५० हजार २५३ रुपये खर्च करणार आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, तुळशी व विहार या सात धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करणे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. धरण परिसर हा अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा पाणीपुरवठा स्त्रोत असल्याने अनधिकृत प्रवेश रोखणे आणि कठोर सुरक्षा करणे यासाठी सुरक्षेसंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणजे धरण परिसरातील संवेदनशील ठिकाणी मजबूत फेन्सिंग उभारण्यात येत आहे. फेन्सिंगसाठी गंजरोधक कोटिंग केलेल्या लोखंडी जाळीचा वापर करण्यात येत असून, ती सिमेंट काँक्रीट खांबांवर बसवली जात आहे. यामुळे वन्यप्राण्यांची तसेच अनधिकृत व्यक्तींची ये-जा रोखण्यास मदत होणार आहे, असे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

धरण परिसरात सुरक्षेचे नियम अधिक कडक करण्यात आले असून, फेन्सिंग पूर्ण झाल्यानंतर नियमित देखभाल व तपासणी केली जाणार आहे.

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

Mumbai : ४०० टन वजनी क्रेन उलटली; BKC मध्ये मेट्रो कामादरम्यान मोठा अपघात

पुण्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञाला 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढले; सायबर चोरट्यांनी तब्बल ७८ लाख रुपये लुटले

"मुलगा माझ्यासारखा दिसत नाही..."; पत्नीवरील संशयामुळे पित्यानेच घेतला सहा वर्षीय मुलाचा जीव; चौकशीत धक्कादायक खुलासा

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी