मुंबई

ठाकरे सरकारने दिलेल्या नावांची यादी रद्द केल्यास पुन्हा कोर्टात जाणार;अंबादास दानवे यांचा इशारा

सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना ही यादी रद्द करण्याचे पत्र पाठवले आहे.

वृत्तसंस्था

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पक्षपातीपणे वागत असल्याचे सिद्ध होत आहे. ठाकरे सरकारने दिलेल्या नावांची यादी राज्यपालांना रद्द करता येणार नाही. तसे केल्यास पुन्हा एकदा कोर्टात जाऊ,” असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना यादी पाठवली होती; मात्र आता सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना ही यादी रद्द करण्याचे पत्र पाठवले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला विरोध

अंबादास दानवे म्हणाले, “हे प्रकरण कोर्टात गेले होते. लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत कोर्ट राज्यपालांना निर्देश देऊ शकत नव्हते; मात्र तशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे ती यादी राज्यपालांना रद्द करता येणार नाही. दोन वर्षे त्यांनी ही यादी प्रलंबित ठेवली. ही यादी रद्द करता येणार नाही. हा कॅबिनेट निर्णय होता. आम्ही न्यायालयात जाऊ. जे जे काही करता येईल ते आम्ही करू,” असा इशारा त्यांनी दिला.

Mumbai : कल्याण-इगतपुरी मार्गावर १३ तासांचा मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

भायखळा केबल पुलाचे काम अंतिम टप्प्यात; दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार

मुंबईकरांची AC लोकलला पसंती; अवघ्या ४ महिन्यात दीड कोटी प्रवाशांचा प्रवास

बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या घाऊक बदल्या; कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

फुफ्फुसात अडकलेला एलईडी बल्ब काढत ९ महिन्यांच्या बाळाचे वाचवले प्राण ; पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांची कामगिरी