

मध्य रेल्वेने कल्याण-इगतपुरी मार्गावरील आटगाव स्थानकाजवळ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यासाठी १३ तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक ६ जून रोजी दुपारी २ वाजल्यापासून ७ जून रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
या कालावधीत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द, मार्ग बदलून धावणार, वेळेत बदल करण्यात येणार किंवा काही गाड्या अर्ध्या मार्गावरच थांबवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
६ जून रोजी खालील गाड्या रद्द राहणार आहेत :
गाडी क्रमांक ११०११ CSMT - धुळे एक्स्प्रेस
गाडी क्रमांक ११०१२ धुळे - CSMT एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२१०९ CSMT - मनमाड एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२११० मनमाड - CSMT एक्स्प्रेस
मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या
कल्याण, कर्जत, पुणे, मनमाड, दौंड आणि कुर्डुवाडी मार्गे काही गाड्या वळवण्यात येणार आहेत.
त्यामध्ये :
११०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस - बलिया
०१०२७ दादर - गोरखपूर
१५०६६ पनवेल - गोरखपूर
११००१ CSMT - बल्लारशाह
१२१३१ दादर - साईनगर शिर्डी
१७०५७ CSMT - लिंगमपल्ली
या गाड्यांचा समावेश आहे.
वेळेत बदल करण्यात आलेल्या गाड्या
६ जून रोजी :
१२८०९ CSMT - हावडा
१८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस - शालीमार
१२३२२ CSMT - हावडा
०१०७९ CSMT - गोरखपूर
१२१६७ लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी
११०५७ CSMT - अमृतसर
१२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटलीपुत्र
७ जून रोजी :
१२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस - हटिया
२२१७७ CSMT - वाराणसी
०२१४१ CSMT - नागपूर
२२५३८ गोरखपूर - CSMT
अर्ध्या मार्गावर थांबवण्यात येणाऱ्या गाड्या
१२०७२ हिंगोली डेक्कन – CSMT एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच धावणार
१७६११ नांदेड – CSMT एक्स्प्रेस मनमाडपर्यंतच धावणार
१२०७१ CSMT – हिंगोली डेक्कन एक्स्प्रेस नाशिकहून सुटणार
१७६११ CSMT – नांदेड एक्स्प्रेस मनमाडहून सुटणार
प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.