मुंबई

कोरोनाच्या चौथ्या लाटेची उलटी गिनती सुरु ,रुग्ण दुपटीची संख्या घसरती

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाची पहिली लाट उसळली होती.

प्रतिनिधी

कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आले असून रोज अडीच हजारांच्या घरात आढळणारी रुग्ण संख्या आता ५००च्या आत आली आहे. तर १२ हजारांच्या घरात गेलेली सक्रिय रुग्ण संख्या आता ७ हजारांवर आली असून रुग्ण दुपटीचा कालावधी ६८६ दिवसांवर आला आहे. सक्रिय रुग्ण संख्येत घट आणि रुग्ण दुपटीची घसरती संख्या पहाता कोरोनाच्या चौथ्या लाटेची उलटी गिनती सुरु झाली आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाची पहिली लाट उसळली होती. त्यानंतर आणखी दोन लाटा धडकल्या होत्या. मात्र राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे तिन्ही लाटा परतवण्यात यश आले. परंतु मे महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेने शिरकाव केला आणि रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. मात्र सद्यस्थितीत रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाल्याने काही प्रमाणात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

मुंबईत आठवडाभरापूर्वी २६ जून रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ७२७ इतकी होती. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४४४ दिवस होता. हे प्रमाण १४० हून जास्त दिवसांनी वाढून ५८४ दिवसांवर गेले आहे. तर रुग्ण वाढीचे प्रमाण ०.११३ वरून ०.०३७ पर्यंत खाली आले आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरात मुंबईत ७६७१ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनी शरद पवारांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, ‘त्यांचे विचार आजही शाश्वत’

जगभरातील लाखो वेबसाइट्स पडल्या बंद; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा सर्व्हर बंद

Mumbai: सायनमधील ४ एकर भूखंड ‘विहिंप’ला देण्यास राज्य सरकारची मंजुरी

IND vs SA: मालिका विजयासाठी आज चढाओढ; भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात नाणेफेक, दव ठरणार निर्णायक

भारत-रशियादरम्यान आर्थिक रोडमॅप; १०० अब्ज डॉलरचे द्विपक्षीय व्यापार लक्ष्य पाच वर्षांत गाठणार