मुंबई

तरुणीचा विनयभंग करुन कुटुंबियांना मारहाण बोरिवलीतील घटना; पळून गेलेल्या आरोपीस अटक

कुटुंबियांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला

नवशक्ती Web Desk

मुंबई : बोरिवली येथे एका २५ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग करून तिच्यासह तिच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी अमन सुरेश बनसोडे याला एमएचबी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

बोरिवली येथे राहणारी तक्रारदार तरुणी रात्री नियमितपणे भटक्या कुत्र्यांना जेवण खाऊ घालण्याचे काम करते. रविवारी रात्री ११ वाजता ती योगीनगर परिसरात कुत्र्यांना अन्न देत असताना तिथे आलेल्या अमनने तिला अश्लील शिवीगाळ करून तिच्याशी विचित्र चाळे करून विनयभंग केला होता. त्यानंतर त्याने तिला आणि तिच्या आई-वडील व भावाला हाताने आणि बांबूने मारहाण केली. तिच्यावर गँग रेपसह जीवे मारण्याची धमकी देऊन तो पळून गेला होता.

घडलेल्या प्रकारानंतर या तरुणीसह तिच्या कुटुंबियांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह मारहाण करणे, अश्‍लील शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकातील सचिन शिंदे, डॉ. दीपक हिंडे, निलेश पाटील, घोडके, शिरसाट यांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. या आरोपीच्या नावावरून त्याचे फेसबुक अकाऊंट शोधून त्याच्या कारचा क्रमांक पोलिसांनी मिळविला होता. या कारच्या क्रमांकावरून त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया अनंतात विलीन; पुत्र गौतम सिंघानिया यांनी दिला मुखाग्नी

प्रवाशांसाठी खुशखबर! नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० पेक्षा जास्त फ्लाइट्स सुरू; देशभरात कनेक्टिव्हिटी वाढणार

Mumbai : गॅस सेवांच्या नावाखाली सायबर फसवणूक; APK फाइलने काही मिनिटांत बँक खाती रिकामी, काय काळजी घ्यावी?

Maharashtra Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल; ग्रामीण भागासाठी रॉकेलचा कोटा मंजूर