मुंबई

महापालिकेच्या मुख्यालयालाच डासांचा विळखा; सुरक्षारक्षक झाले डेंग्यू-मलेरियाने त्रस्त

मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असताना मुंबईकरांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयालाच डासांनी विळखा घातला आहे.

Swapnil S

पूनम पोळ / मुंबई

मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असताना मुंबईकरांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयालाच डासांनी विळखा घातला आहे. यामुळे अनेक सुरक्षारक्षक डेंग्यू आणि मलेरियाने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. अखेरीस महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने दोन दिवस फवारणी करून सारवासारव केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकासमोर असलेल्या मुंबई महानगरपालिका मुख्यालयात डासांचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेच्या सुरक्षा दलात एकूण ६० कर्मचारी तैनात आहेत. यापैकी दहा ते बारा सुरक्षा कर्मचारी दररोज रात्रपाळीला कर्तव्यावर असतात. यापैकी अनेक सुरक्षारक्षकांना या डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांना सामोरे जावे लागले आहे. एक सुरक्षारक्षक तर गेले आठ दिवस डेंग्यूचे उपचार घेत आहेत. अखेरीस त्यांना सकाळच्या शिफ्टमध्ये कामाला येण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती सुरक्षारक्षक विभागातील सूत्रांनी दिली.

पालिका मुख्यालयाच्या परिसरात सर्वत्र मच्छरांचे साम्राज्य आहे. या परिसरात असलेले फळ मार्केट, मच्छी मार्केट आणि अन्य विक्रेत्यांकडील पदार्थांमुळे तसेच सांडपाण्यामुळे मच्छर होत असतात. मच्छरांमुळे सुरक्षा रक्षक त्रस्त झाले होते. सुरक्षारक्षकांच्या सततच्या मागणीमुळे कीटकनाशक विभागाने गेल्या दोन दिवसांपासून फवारणी सुरू केली आहे.

या परिसरात सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान दोन दिवस सातत्याने फवारणी करण्यात आली आहे. या फवारणीत एडिस या प्रजातीचे मच्छर आढळले आहेत. मच्छरांची पैदास होऊ नये यासाठी मॉस्किटो लार्विसिड ऑइल फवारले जाते. त्याचा वापर केला जात असून योग्य ती काळजी कीटकनाशक विभागाकडून घेतली जात आहे.

- राहुल बुचडे, कनिष्ठ आरक्षक कीटकनाशक विभाग

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल