@ShivSenaUBT_
मुंबई

ठाकरे गटाची गळती काही केल्या थांबेना ; उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार एकनाथ शिंदेंच्या गळाला

काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी सभागृह नेत्या तृष्ण विश्वासराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर...

नवशक्ती Web Desk

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत शिवसेनेतून बंड केलं. यानंतर भाजपशी घरोबा करत सरकार स्थापन केलं. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला लागलेली गळती अद्यापही कमी झालेली नाही. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, माजी आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. विप्लव बाजोरिया, मनीषा कायंदे यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी सभागृह नेत्या तृष्ण विश्वासराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी आणखी एका शिलेदाराने शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली. ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचे असेल त्यांनी निघून जावं, असं देखील सांगितलं होतं. त्यामुळे ठाकटे गटाची साथ सोडणाऱ्यांची संख्या अजून वाढली. आता मंगेश सातमकर यांनी देखील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.

कोण आहेत मंगेश सातमकर?

मंगेश सातमकर हे १९९४ मध्ये पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक पदी निवडून आले. त्यानंतर २००२,२००७ आणि २०१७ साली ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी २००४,२००६, २००७ आणि २०१८ मध्ये महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवलं. २०१४ साली त्यांनी सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. यावेली मात्र त्यांचा पराभव झाला.

अत्याचाराचा गुन्हा दाखल

मंगेश सातमकर यांच्याविरोधात वडाळा टीटी पोलीस ठाण्यात एका महिनेले अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या सायन येथील कार्यालयात काम करणाऱ्या महिलेनेच हा गुन्हा दाखल केला होता. यामहिलेने सातमकर यांनी आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा अत्याचार केल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

अर्बन कंपनी, बोट ब्रँडच्या मूळ कंपनीला IPO लाँच करण्यासाठी सेबीची परवानगी; १३ कंपन्या एकत्रितपणे १५,००० कोटी उभारणार

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी