मुंबई

मुंबईतील मार्केटचा कायापालट दिवाळीनंतर बदल दिसणार - पालकमंत्री केसरकर

सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

नवशक्ती Web Desk

मुंबई : अस्वच्छता, दूरवस्था अशी स्थिती आता मुंबईतील मार्केटमध्ये यापुढे दिसणार नाही. मुंबईतील मार्केटमध्ये अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत मुंबईतील मार्केट नवीन लूकमध्ये दिसतील, असा विश्वास मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिका मुख्यालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दादरचे फुलमार्केट, आगर बाजार, सिटीलाईट आदी मार्केट रोज गजबजलेली असतात. अशा मार्केटच्या ठिकाणी आवश्यक सुविधा नाहीत. शौचालयाची सुविधा नसल्याने अनेकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. मार्केट स्वच्छ व सुविधांयुक्त ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. स्वच्छतेसाठी अत्याधुनिक मशिनरी, टॉयलेट व इतर सुविधा निर्माण करून मार्केटचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे, असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले. दादरचे फूलमार्केट, आगर बाजार आदी मार्केटना भेटी देऊन तेथील आढावा घेतल्याचे केसरकर म्हणाले. दिवाळीनंतर मार्केटमध्ये हळूहळू बदल दिसतील. विशेषत: अत्याधुनिक टॉयलेटची सुविधा उपलब्ध करण्यासाठी काही खासगी कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. त्यामुळे सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

हाजीअली येथे अत्याधुनिक टॉयलेट

हाजीअलीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी रोज हजारो पर्यटक येत असतात. अशी ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून नावारूपाला यावीत, यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. हाजीअली येथे अत्याधुनिक टॉयलेटची सुविधा उपलब्ध करण्यासाठी विचार सुरू असून लवकरच याबाबतची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत