मुंबई

तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार विद्यापीठ उचलणार

नवशक्ती Web Desk

मुंबई : राज्यातील तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार विद्यापीठ उचलणार आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क विद्यापीठ भरणार आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

या बैठकीत त्यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना आवाहन केले की, तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार संबंधित विद्यापीठांनी उचलावा. बहुतांशी कुलगुरूंनी हा प्रस्ताव स्वीकारला आहे, असे पाटील म्हणाले.

विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती देण्यात यावी. मुंबई विद्यापीठाने ‘तृतीयपंथी’साठी विशेष कॉलम तयार केला आहे. राज्याच्या तंत्रशिक्षण महासंचालनालयाने अभियांत्रिकी व औषध निर्माण अभ्यासासाठी तृतीयपंथींना प्रवेश देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस