(डाव्या बाजूला) दर्शनावेळी सामान्य लोकांना घाईघाईने ढकलले जाते एक्सवरील व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट
मुंबई

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या गणपतीसाठी दर्शनाच्या वेळी भक्तांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत दोन वकिलांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.

Swapnil S

मुंबई : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या गणपतीसाठी दर्शनाच्या वेळी भक्तांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत दोन वकिलांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.

‘लालबागचा राजा’च्या दर्शनावेळी सर्वसामान्यांना वेगळी वागणूक वर्षानुवर्षे दिली जात असून गणपतीच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आलेले सामान्य लोक आणि महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना गणेश मंडळाची एक कार्यकर्ती घाईघाईने ढकलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. राजाच्या एका पायावरून भक्तांना ढकलले जात असून दुसऱ्या पायाजवळ मात्र महत्त्वाच्या व्यक्ती दर्शन, फोटो काढणे आदींसाठी निवांत वेळ घेत असल्याचे या व्हिडीओत दिसते.

तक्रारकर्त्या वकिलांनी सांगितले की, दर्शनादरम्यान लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्याशी भेदभाव केला जातो. मंडळाच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांकडून सामान्य नागरिकांशी गैरवर्तन केले जाते, असे वकील आशिष राय आणि पंकजकुमार मिश्रा यांनी मुंबई पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग १० पदरी होणार; राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

अजितदादांनी जपली विचारधारा! तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले

बँक खात्यात ४ नॉमिनी ठेवता येणार; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी