मोबाईलच्या आहारी गेलेल्या समाजाची विचारशक्ती हरवत चाललीय! 'बोध कीर्तन 'च्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन X|@rautsanjay61
मुंबई

मोबाईलच्या आहारी गेलेल्या समाजाची विचारशक्ती हरवत चाललीय! 'बोध कीर्तन 'च्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मोबाईलच्या आहारी गेलेल्या समाजाला आज विचार करायलाही वेळ उरलेला नाही. सततच्या घडामोडी, प्रश्न आणि आंदोलनांच्या आवर्तनात माणसाची विचारशक्तीच मारली जात आहे. वाचन, चिंतन आणि मननाची जागा मोबाईलने घेतली आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

Swapnil S

मुंबई : मोबाईलच्या आहारी गेलेल्या समाजाला आज विचार करायलाही वेळ उरलेला नाही. सततच्या घडामोडी, प्रश्न आणि आंदोलनांच्या आवर्तनात माणसाची विचारशक्तीच मारली जात आहे. वाचन, चिंतन आणि मननाची जागा मोबाईलने घेतली आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'बोध कीर्तन' या पुस्तकाचे प्रकाशन दादरमधील ब्राह्मण सहाय्यक संघामध्ये झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या पत्रकारितेतील प्रवासातील आठवणी सांगत त्यांच्या लेखन शैलीचे कौतुक केले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार-लेखक अंबरीश मिश्र, मेहता प्रकाशनचे अखिल मेहता उपस्थित होते.

वाचकांच्या मनापर्यंत विषय पोहोचवण्याची कला अवगत

घोषणा देणे आणि एखाद्या विषयाच्या अंतरंगात जाऊन त्याचा वेध घेणे यात फरक आहे. संजय राऊत यांना विषयाच्या मुळाशी जाण्याची आणि त्यानंतर आपल्या शब्दांतून तो वाचकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याची कला अवगत आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, अक्षरांचे शब्द होतात, शब्दांच्या ओव्याही होतात आणि शिव्याही होतात. या दोन्हींचे सामर्थ्य संजय राऊत यांच्या लेखणीत आहे. कोणाला ओव्या द्यायच्या आणि कोणाला शिव्या, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे, असेही ठाकरे म्हणाले.

शुद्ध, अर्थपूर्ण मराठीचा वापरही महत्त्वाचा

आजच्या पिढीचे वाचन कमी होत असून मोबाईलवरील अवलंबित्व वाढले आहे. भविष्यात अक्षर आणि पेन संग्रहालयात जातील की काय, अशी शंका वाटते. मात्र, त्याहून गंभीर बाब म्हणजे माणसाची विचार करण्याची शक्तीही हरवत चालली आहे. सततच्या घडामोडी आणि विविध प्रश्नांचा मारा करून माणसाला विचार करायलाच वेळ दिला जात नाही. मराठी भाषेचा आग्रह धरताना शुद्ध आणि अर्थपूर्ण मराठीचा वापरही तितकाच महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तम साहित्य निर्मितीसाठी लेखकांना तुरुंगात पाठवायला हवे!

पुस्तक सोहळ्यात प्रास्ताविक करताना संजय राऊत म्हणाले, लेखकांना काही काळ तुरुंगात पाठवायला हवे. कारण जगभरातील अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींची निर्मिती तुरुंगातच झाली आहे. मलाही तुरुंगात १०५ दिवस काम नसल्याने वाचन, चिंतन आणि लेखनासाठी वेळ मिळाला. या काळात अनेक विषयांवर विचार करून लेखन करता आले, असे मिश्कील विधान राऊत यांनी केले. पुस्तकाच्या 'बोध कीर्तन' या नावावर काहींना वाटते की राऊत आध्यात्मिक कसे असू शकतात ? परंतु, वक्त्याकडे सांगण्यासारखे काही असेल तरच तो उत्तम कीर्तन करू शकतो आणि अशाच कीर्तनकाराला जास्त श्रोते लाभतात. असे सांगतानाच दररोज सकाळी १० वाजता आपण कीर्तन करत असल्याचे म्हणत त्यांनी चांगली फटकेबाजी केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन

मुंबईकरांना मिळणार ४०० नवे लोखंडी कचरा डबे; एका डब्यासाठी पंधराशे रुपये अधिक मोजणार

IIT Bombay Student Suicide Case : आत्महत्येची सीबीआय चौकशी करा! साहिल वाकोडेच्या पालकांची न्यायालयात याचिका

Mumbai : १४ ट्रॅक्शन सबस्टेशन्सची उभारणी अंतिम टप्प्यात; बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पाच, तर गुजरातमध्ये ९ सबस्टेशन्स

Thane : 'देवाभाऊंवरच विश्वास, तेच न्याय मिळवून देतील'; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाची मुख्यमंत्र्यांना साद