मुंबई

BBC IT raids : "प्रसार माध्यमांवरील छापेमारी म्हणजे..." बीबीसी आयटी धाडीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

बीबीसीच्या गुजरात दंगलीवरील माहितीपटाचा वाद सुरु असतानाच आयकर विभागाने (BBC IT raids) बीबीसीच्या कार्यालयांवर केलेल्या छापेमारीवर विरोधकांचा निशाणा

प्रतिनिधी

आज आयकर विभागाकडून (BBC IT raids) बीबीसीच्या दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) कार्यालयावर छापे टाकण्यात आले. एकीकडे बीबीसीच्या गुजरात दंगलीवरील माहितीपटाचा वाद सुरु असतानाच आयकर विभागाने केलेल्या या कारवाईवरून देशभरातील विरोधकांकडून टीका होत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका करताना म्हंटले की, " प्रसार माध्यमावरील छापेमारी कुठल्या लोकशाहीमध्ये बसते? हे म्हणजे माध्यमांचा गाला घोटण्याचे काम सूर आहे." अशी टीका केली.

हेही वाचा :

बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "आपण लोकशाहीचे जे चार स्तंभ म्हणतो, त्यामध्ये न्यायव्यवस्था, प्रशासन, शासन यांच्यासह महत्त्वाचा स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यमही आहे. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणे, हे कोणत्या लोकशाहीत बसते? याचाच अर्थ, आम्ही वाटेल ते करू पण आवाज उठवायचा नाही. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू, ही जी पाशवीवृत्ती आपल्या देशात आज फोफावताना दिसते आहे. आपण वेळेत एकत्र आलो नाही आणि आपली ताकद वाढवली नाही तर उद्या संपूर्ण देश खावून टाकेल." असे म्हणत त्यांनी जोरदार केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी