मुंबई

गोवंडी येथे 'अनधिकृत' चार हजार किलो मांस जप्त

बेकायदापणे मांस विक्री करणाऱ्यांचा बोलबाला असून, गोवंडी पश्चिम येथे अनधिकृतपणे मांस विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिमेत तब्बल चार हजार किलो मांस जप्त करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : बेकायदापणे मांस विक्री करणाऱ्यांचा बोलबाला असून, गोवंडी पश्चिम येथे अनधिकृतपणे मांस विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिमेत तब्बल चार हजार किलो मांस जप्त करण्यात आले आहे. पालिकेच्या बाजार विभागामार्फत धडक कार्यवाही मोहीम हाती घेतली आहे. तसेच अनधिकृतपणे व्यवसायात वापरण्यात येणारी साधन सामुग्रीही जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, उघड्यावरील पदार्थ आरोग्यास हानिकारक असून, मुंबईकरांनी उघड्यावरील पदार्थ खरेदी करू नये, सेवन करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईतील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी वेळोवेळी उपाययोजना करण्यासाठीच्या सूचना पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. अनधिकृतपणे मांसविक्री करणाऱ्यांविरोधात धडक कार्यवाही मोहीम राबवण्याच्या सूचना डॉ. सुधाकर शिंदे यांनी बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश रसाळ यांना दिल्या होत्या. बाजार विभागामार्फत लागोपाठ दोन दिवस धडक मोहीम राबवत ४ हजार किलोंहून अधिक मांस जप्त करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ४१० (१) अन्वये जनावरांच्या अनधिकृत आयातीवर, कतलींवर आणि अनधिकृत मांस, अनधिकृत कोंबडी व अनधिकृत मासळी विक्रेत्यांवर कार्यवाही नियमितपणे करण्यात येते. याच अंतर्गत गोवंडी पश्चिम परिसरात नुकत्याच झालेल्या धडक कारवाईत सुमारे २ हजार ८०० किलो बकऱ्यांचे मांस जप्त करण्यात आले. कारवाईसाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीसह, एम पूर्व विभागाच्या अनुज्ञापन खात्याचे कर्मचारी आणि सहाय्यक अभियंता (परिरक्षण) उपस्थित होते. या कारवाईत शेळ्या मेढ्यांचे १ हजार ४६० किलो मांस जप्त करण्यात आले. तसेच प्रचलित पद्धतीनुसार या मांसाची देवनार क्षेपणभूमी येथे विल्हेवाट लावण्यात आली.

२१ एलपीजी सिलिंडर जप्त!

‘एम पूर्व’ विभागाच्या अनुज्ञापन खात्यामार्फत सहा दुकांनांच्या ठिकाणी केलेल्या कार्यवाहीत ६ डीप फ्रिज, २१ एलपीजी सिलेंडर, ९ भांडी आणि इतर सामान जप्त करण्यात आले. ‘एम पूर्व’ विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्या नेतृत्वात रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासन कार्यवाही करण्यात आली. तसेच देवनार पोलीस ठाणे येथे तीन व्यक्तींविरोधात दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

डेटा शेअरवर बंदी; भारताबाहेर डेटा जाऊ देण्यास अटकाव, कम्युनिकेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर पुरवठादारांवर निर्बंध

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलनामात रंगली पंढरी; पाहा खास क्षणचित्रे

सोन्याच्या दरात २ हजारांची घसरण; भाव १.४७ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर, चांदी ५,००० रुपयांनी स्वस्त

Pune : ‘गुन्हेगार ठरवल्यास पोलीस उपायुक्तांच्या घराबाहेर आत्महत्या करेन’; माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा इशारा

POP मूर्ती विसर्जनाला टप्प्याटप्प्याने बंदी घालावी; राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला विनंती