मुंबई

उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्तीला ED चे समन्स

अभिनेत्री उर्वशी रौतेला तसेच अभिनेत्री व तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

Swapnil S

मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला तसेच अभिनेत्री व तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

‘१एक्सबेट’ या बेकायदेशीर सट्टेबाजी ॲॅप प्रकरणात मिमी चक्रवर्तीला १५ सप्टेंबर रोजी आणि उर्वशी रौतेलाला १६ सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. आता दोघींनाही ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर राहावे लागणार आहे. ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत या दोन्ही अभिनेत्रींचे जबाब नोंदवले जातील. चौकशीदरम्यान त्यांचा ‘१एक्सबेट’ या बेकायदेशीर सट्टेबाजी ॲॅपशी काय संबंध आहे, हे तपासले जाईल.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला आणि मिमी चक्रवर्ती यांना ‘१एक्सबेट’ ॲॅपच्या जाहिरातीसंदर्भात झालेल्या देवाणघेवाणसंदर्भात चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. ईडीला या दोघींची चौकशी करून त्यांना या सट्टेबाजी करणाऱ्या मोबाईल ॲॅपच्या प्रसिद्धीसाठी पैसे कसे आणि केव्हा मिळाले? याची चौकशी करावयाची आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी 'डेडलाईन', आयोगालाही फटकारले

खाडाखोड असेल तर मराठ्यांना प्रमाणपत्र देऊ नये; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र कॅबिनेट बैठकीत ८ मोठे निर्णय; ॲनिमेशन-गेमिंग धोरणासह विद्यार्थ्यांना दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा : बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त; मंत्री छगन भुजबळ यांना दिलासा

Mumbai : इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा आजपासून सुरू; एक किमीला १५ रुपये भाडे; राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी