प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

शुक्रवारपासून वेसाव्यात सी फूड फेस्टिव्हल; मत्स्यप्रेमींसाठी ताज्या माशांची मेजवानी

मत्स्यप्रेमी आतुरतेने वाट पाहत असलेला कोळी सी फूड फेस्टिव्हल वेसाव्यात रंगणार आहे. वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटीच्या समोरील गणेश मंदिरच्या मैदानावर हा महोत्सव शुक्रवार, २३ ते रविवार, २५ जानेवारीपर्यंत जल्लोषात साजरा होणार आहे.

Swapnil S

मुंबई : मत्स्यप्रेमी आतुरतेने वाट पाहत असलेला कोळी सी फूड फेस्टिव्हल वेसाव्यात रंगणार आहे. वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटीच्या समोरील गणेश मंदिरच्या मैदानावर हा महोत्सव शुक्रवार, २३ ते रविवार, २५ जानेवारीपर्यंत जल्लोषात साजरा होणार आहे. यंदा महोत्सवाचे हे १९ वे वर्ष आहे. वेसावा कोळी सी फूड फेस्टिव्हलचे अध्यक्ष स्वप्नील भानजी आणि उपाध्यक्ष महेंद्र लडगे यांनी ही माहिती दिली.

महोत्सवाचे यजमानपद यंदा वेसावा कोळी जमात पब्लिक रिलिजस अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांना असून वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, वेसावा कोळी सर्वोदय सहकारी सोसायटी, वेसावा कोळी मच्छिमार नाखवा मंडळ ट्रॉलर यांचे त्यांना सहकार्य करणार आहे. गेल्या वर्षी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार,कल्याण, अंबरनाथ येथील ५० हजारांहून अधिक लोकांनी या महोत्सवाला भेट दिली होती.

लज्जतदार खाद्य संस्कृती

कोळी समाजाची संस्कृती, परंपरा, खाद्य पद्धती आणि जेवणाची लज्जत महोत्सवात अनुभवायला मिळत आहे. मासळीच्या विविध जाती, निरनिराळ्या पारंपरिक खाद्यदार्थांचे प्रदर्शन तसेच विक्री, वेसावकरांचे कोळी नृत्य आणि परंपरा इत्यादींचे दर्शनही या तीन दिवसांच्या महोत्सवात होणार असल्याची माहिती महेंद्र लडगे व खजिनदार विशाल चंदी यांनी दिली. येथे होणारा कोळी महोत्सव यशस्वी करण्यासाठी महोत्सवाचे आयोजक महेंद्र लडगे, स्वप्नील भानजी, पृथ्वीराज चंदी, अमित बोले, विशाल चंदी आणि सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग