मुंबई जल टँकर असोसिएशनने १० एप्रिलपासून त्यांच्या सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय भूमिगत जल प्राधिकरणाकडून जलस्रोत काढण्याच्या परवानसाठी परवाना घेण्याचे आदेश दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत १८०० ते २५०० पाण्याचे टँकर आहेत. जे स्थानिक कूपनलिका आणि बोअरवेल्समधून मिळवलेले २०० दशलक्ष लिटर पाणी रोज पुरवतात.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय भूमिगत जल प्राधिकरणाने २०२० मध्ये अत्यधिक भूमिगत जल काढण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी परवाना प्रणाली लागू केली होती. सध्या, अंदाजे ८०० ते १ हजार भूमिगत जल स्रोत पाण्याच्या टँकरद्वारे वापरण्यात येत आहेत. मुंबई मनपाने पाणी टँकर मालकांना नोटीसा पाठवायला सुरुवात केली आहे, त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत, अन्यथा त्यांचा पुरवठा थांबवावा लागेल.