मुंबई

फुकट्या प्रवाशांना गारेगार प्रवास पडला महागात; दोन कोटींचा दंड वसूल

मार्च २०२४ मध्ये सामान बूक न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २.७५ लाखांचा दंड वसूल केला. तर विनातिकीट अंतरापेक्षा अधिकचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात केलेल्या कारवाईतून १६.७७ कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

Swapnil S

मुंबई : थंडा थंडा कूल कूल प्रवास, तोही विना तिकीट चांगलाच महागात पडला. वातानुकूलित लोकलने विना तिकीट प्रवास करणाऱ्या ६० हजार प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाई करत तब्बल दोन कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विना तिकीट अंतरापेक्षा अधिकचा प्रवास, सामान बूक न करता घेऊन जाणे अशा प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर, हाॅलिडे स्पेशलने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणीच्या विशेष टीमने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान केलेल्या दंडात्मक कारवाईतून तब्बल १७३.८९ कोटींचा दंड वसूल करण्यात आला.

दरम्यान, मार्च २०२४ मध्ये सामान बूक न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २.७५ लाखांचा दंड वसूल केला. तर विनातिकीट अंतरापेक्षा अधिकचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात केलेल्या कारवाईतून १६.७७ कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह