Mumbai : पश्चिम रेल्वेचा नवीन कोचिंग डेपो करी रोडला  
मुंबई

Mumbai : पश्चिम रेल्वेचा नवीन कोचिंग डेपो करी रोडला

मुंबई सेंट्रल आणि दादर येथून आगामी काळात अधिक गाड्या सुरू करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांमधील मोठा अडथळा दूर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने करी रोड आणि लोअर परेल दरम्यान ९८ कोटी खर्चाच्या नवीन कोचिंग डेपोला मंजुरी दिली आहे.

Swapnil S

अभिषेक पाठक/मुंबई

मुंबई सेंट्रल आणि दादर येथून आगामी काळात अधिक गाड्या सुरू करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांमधील मोठा अडथळा दूर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने करी रोड आणि लोअर परेल दरम्यान ९८ कोटी खर्चाच्या नवीन कोचिंग डेपोला मंजुरी दिली आहे.

या प्रस्तावित सुविधेत रेल्वे डब्यांच्या देखभाल आणि निरीक्षणासाठी ‘दोन पिट मार्गिका’ आणि गाड्या उभ्या करण्यासाठी सात स्टेबलिंग लाइन्स असतील. या पिट लाइन्ससाठी ३१ मार्च रोजी औपचारिक मंजुरी दिली असून, हे काम १५ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. स्टेबलिंग लाइन्सची मंजुरी सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा नवीन डेपो धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. मुंबई सेंट्रल येथील पिट लाइन्स सध्या पूर्ण क्षमतेने सुरू असून तिथे विस्ताराला वाव नाही. यामुळे मुंबई सेंट्रल आणि दादर टर्मिनसवरून नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यावर मर्यादा येत होत्या. हा नवीन डेपो मुंबई सेंट्रलपासून सुमारे २ किमी आणि दादरपासून सुमारे २.५ किमी अंतरावर आहे, ज्यामुळे दोन्ही टर्मिनससाठी तो सोयीचा ठरेल. या सुविधेमुळे गाड्यांची देखभाल, स्वच्छता आणि गाड्या उभ्या करण्याची क्षमता वाढेल. नवीन सेवांसाठी विद्यमान पिट लाइन्स रिकाम्या होतील. वंदे भारत, एसी लोकल आणि १५ डब्यांच्या उपनगरीय गाड्यांसह पश्चिम रेल्वे आपला ताफा वाढवत असताना, हा नवीन डेपो भविष्यातील विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

करी रोड कोचिंग डेपोचा तपशील

  • ठिकाण : करी रोड व लोअर परेल दरम्यान

  • प्रकल्प खर्च : ९८ कोटी

  • पिट लाइन्स : २ (देखभालीसाठी)

  • स्टेबलिंग लाइन्स : ७ (पार्किंगसाठी)

  • पूर्ण होण्याचा कालावधी : १५ महिने

गेल्या वर्षभरात आम्ही प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी भांडवली खर्चात सुमारे २२ हजार कोटी खर्च केले. याशिवाय, उपनगरीय तसेच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी नवीन डेपो आणि कॉरिडॉरचे काम सुरू आहे. हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
पंकज सिंह, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई सेंट्रल विभाग

Mumbai : काँक्रीटीकरणाला डेडलाईन; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

"घाण नका करू... हे भारत नाहीये"; नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना सुनावलं; गुटखा थुंकल्यानंतर रस्ता साफ करून घेतला, Video व्हायरल

ठाण्यात भटक्या श्वानांचा त्रास वाढला; ॲनिमल हेल्पलाइनवर १५८ तक्रारी

Pune : दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत होता… आईनेच घेतला ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; स्वतःच दिली कबुली

Mumbai : अखेर मेट्रो ९ सुरू! पहिल्या प्रवाशाची भावनिक प्रतिक्रिया; 'हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील'; Video