प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

...तोपर्यंत काम करणार नाही; शताब्दी रुग्णालयातील परिचारिकांचा निर्धार

मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात सायंकाळी ४ नंतर रुग्णसेवेसाठी एकही डॉक्टर उपलब्ध नसतो.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात सायंकाळी ४ नंतर रुग्णसेवेसाठी एकही डॉक्टर उपलब्ध नसतो. त्यांच्या अपरोक्ष विभागातल्या परिचारिका या रुग्णांवर उपचार करत असतात. त्यावेळी त्यांना रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या शंकांना सामोरे जावे लागते. प्रसंगी परिचारिकांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ आणि मारहाणही सहन करावी लागते. तसेच येथे सीसीटीव्ही नसल्याने परिचारिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. या कारणास्तव रुग्णालयाच्या विभागात जोपर्यंत डॉक्टर उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका शताब्दी रुग्णालयातील परिचारिकांनी महापालिका आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांच्यासमोर मांडली. 

शिवाजीनगर येथील शताब्दी रुग्णालयात शनिवारी एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने विभागातील परिचारिकांना रुग्णाच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी १५० ते २०० जणांच्या जमावाने परिचारिकांना घेरले होते.

विभागात डॉक्टर नसल्याने परिचारिकाच काम करत आहेत. यावरून परिचारिकांना नातेवाईकांकडून अपशब्द ऐकावे लागले. रुग्णालयात एकच सुरक्षारक्षक असल्याने जमावाला आटोक्यात आणण्यात परिचारिकाना मोठा संघर्ष करावा लागला. या काळात एका परिचारिकेने पोलिसांना फोन केला असता घटनास्थळी पोलिस एका तासाने पोहोचला, अशी माहिती परिचारिकांनी दिली. हे प्रकरण रविवारी पहाटेपर्यंत पोलीस ठाण्यात सोडवले जात होते.

यासंदर्भात पालिका आरोग्य अधिकारी दक्षा शहा आणि पालिका उपआरोग्य अधिकारी संतोष गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी दाद दिली नाही. याउलट याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या, असा सल्ला गायकवाड यांनी दिला.

रुग्णालयातील सीसीटीव्ही बंद

रुग्णालयातील गंभीर घटना कैद करण्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमरा बसवण्यात आले आहे. मात्र, या रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमरा मागील कित्येक दिवस बंद आहे. असे काही प्रसंग ओढावले तर आरोपी फरार होतात आणि परिचारिकांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आमची सुरक्षा रामभरोसेच आहे, अशी माहिती तेथील परिचारिकांनी दिली. 

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश