मुंबई

Mumbai : विल्सन कॉलेज जिमखाना जैन इंटरनॅशनलकडे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या क्लब हाऊसचे नामकरण

मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाही शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जैन धर्मगुरूंच्या उपस्थितीत जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (जेआयओ) यांनी या क्लब हाऊसचे नामकरण केले.

Swapnil S

मनोज रामकृष्णन/मुंबई

मरीन ड्राइव्हवरील विल्सन कॉलेज जिमखाना आता जैन जिमखान्याकडे जाणार आहे. कॉलेजने भाडेकरारातील अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत हा भाडेपट्टा रद्द करण्यात आला. त्यामुळे या ऐतिहासिक महाविद्यालयाचे क्रीडांगण कायम ठेवण्यात अपयश आल्याचा आरोप कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेने कॉलेज व्यवस्थापनावर केला आहे. दरम्यान, याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाही शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जैन धर्मगुरूंच्या उपस्थितीत जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (जेआयओ) यांनी या क्लब हाऊसचे नामकरण केले.

विल्सन कॉलेजच्या जमिनीचा भाडेपट्टा जेआयओकडे हस्तांतरित करण्याविरोधात प्रोटेस्टंट ख्रिश्चन समुदायाने दाखल केलेल्या दोन याचिकांवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. १६ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने हा भाडेपट्टा जेआयवोकडे वर्ग करण्यापूर्वी १.०२ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे हे मैदान युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया ट्रस्ट असोसिएशन (यूसीएनआयटीए) कडे भाड्याने होते आणि त्याचे व्यवस्थापन विल्सन कॉलेज चालवणाऱ्या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीकडे होते. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ जानेवारीला होणार आहे.

प्रसिद्ध जैन आध्यात्मिक नेते आचार्य नयपद्मसागर सूरी महाराज यांनी एका व्हिडीओद्वारे उद्घाटनाची घोषणा केली. मुख्यमंत्री यांचे आभार मानताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील २० लाख जैनांना एक अद्भुत भेट दिली असून मुंबई पालिका निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले.

माजी विद्यार्थ्यांचे आरोप

माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर भाडेपट्टा टिकवून ठेवण्यासाठी पावले न उचलल्याचा आरोप केला. व्यवस्थापनाला नवीन वाढीव भाडेपट्ट्रीवर जिमखाना वापरण्याची परवानगी दिली. मात्र, तिथे खासगी कंपन्यांना व्यावसायिक कार्यक्रमांसाठी जागा दिल्याने हा नवा भाडेकरार संपुष्टात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध; राजकारणी ते बॉलिवूड दिग्गजांची उपस्थिती

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी

मिठी नदी गाळ घोटाळा : EOW कडून दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल

Mumbai : फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार