प्रातिनिधिक फोटो- फ्रीपिक
मुंबई

महिला पोलिसाचा चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू?

Swapnil S

मुंबई : पोलीस शिपाई गौरी सुभाष पाटील या २८ वर्षांच्या महिला पोलिसाचा चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा आरोप असून या संपूर्ण घटनेची आंबोली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. गौरीचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गौरी पाटील ही कांदिवलीला समतानगर परिसरात राहत होती. सध्या ती मरोळ येथील ‘एल’ विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होती. कानात दुखत असल्याने तिला अंधेरीतील लोखंडवाला संकुल, वास्तू लेनच्या साईद्वार अपार्टमेंटमध्ये असलेल्या ॲक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला ऑपरेशनपूर्वी भुलीचे इंजेक्शन देण्यात आले होते, मात्र या इंजेक्शनमुळे तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

गुरुवारी रात्री ही माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून आंबोली पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळेच गौरी पाटील हिचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे तिचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या अहवालानंतर गौरी पाटील हिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. गौरीच्या मृत्यूची माहिती नंतर तिच्या पालकांना देण्यात आली.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत