अध्यक्षपदी यामिनी जाधव यांची बिनविरोध निवड (Photo-X/@TawdeRitu)
मुंबई

स्थापत्य समिती शहर शिंदे सेनेकडे; अध्यक्षपदी यामिनी जाधव यांची बिनविरोध निवड

प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर गुरुवारी स्थापत्य समिती शहर व उपनगर समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.

Swapnil S

मुंबई : प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर गुरुवारी स्थापत्य समिती शहर व उपनगर समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी शिंदे सेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी भाजपचे अजय पाटील यांची निवड झाली आहे. पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी मुंबई महापालिका मुख्यालयात स्थापत्य समिती सभागृहात घोषणा केली.

तसेच स्थापत्य समिती उपनगर अध्यक्षपदी भाजपच्या संगीता शर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुरेश आवळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा पिठासीन अधिकारी उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समिती सभागृहात केली.

स्थापत्य शहर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या विरोधात विरोधी पक्षाने उमेदवार दिला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होणार, हे अगोदरच निश्चित झाले होते.

संगीता शर्मा यांची बिनविरोध निवड

स्थापत्य समिती उपनगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार संगीता शर्मा यांच्या विरोधात विरोधी पक्षाने उमेदवार दिला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होणार, हे अगोदरच निश्चित झाले होते. गुरुवारी दुपारी २ वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील स्थापत्य समिती सभागृहात पार पडलेल्या स्थापत्य समिती उपनगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता शर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा पीठासन अधिकारी उपमहापौर संजय घाडी यांनी केली. तसेच, स्थापत्य समिती उपनगर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुरेश आवळे यांची निवड करण्यात आली आहे.

किशोरी पेडणेकर जाधव यांच्या भेटीला

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःची शिवसेना स्थापन केली. पहिल्या सभागृहाच्या बैठकीपासून शिंदे सेना व ठाकरे सेना एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. मात्र गुरुवारी स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी यामिनी जाधव यांच्या कार्यालयात जाऊन अभिनंदन केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेते गणेश खणकर आदी उपस्थित होते.

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

अमेरिकी तळांवर हल्ले सुरूच ठेवू; इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर मोजतबांचे पहिलेच वक्तव्य, होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार!

गॅस दरवाढीविरोधात जनआक्रोश; ठाणे, पालघर, कल्याणमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून निषेध

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानहून आणण्याची याचिका फेटाळली; वारसाला न्यायालयात यावे लागेल, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

विधात्यानेच आपले रक्षण केले - डॉ. फारूक अब्दुल्ला