मुंबई

माटुंग्यात लहान भावाची मोठ्या भावाकडून हत्या

लहान भावाची मोठ्या भावाने हत्या केल्याची घटना माटुंगा परिसरात उघडकीस आली आहे.

Swapnil S

मुंबई : लहान भावाची मोठ्या भावाने हत्या केल्याची घटना माटुंगा परिसरात उघडकीस आली आहे. नागराज कन्ना बानल असे हत्या झालेल्या भावाचे नाव असून, त्याच्या हत्येप्रकरणी गोपाल कन्ना बानल याला शाहूनगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोपाल हा माटुंगा येथील लेबर कॅम्प परिससरात राहत असून, मृत नागराज हा त्याचा लहान भाऊ आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यातून तो नेहमी घरात भांडण करत होता. २५ फेब्रुवारीला नागराज हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला आणि त्याने गोपालसोबत वाद घालून भांडण सुरू केले होते. या भांडणातून रागाच्या भरात गोपालने नागराजच्या डोक्यात दांडक्याने मारहाण केली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना शुक्रवारी १ मार्चला रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी नागराज बानलविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यात शनिवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता