राष्ट्रीय

टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळून १० ठार, १३ जखमी

Swapnil S

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी एक टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावरून घसरून अलकनंदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० पर्यटक ठार झाले, तर १३ जण जखमी झाले.

टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्वजण पर्यटक होते आणि ते चोपटा येथे जात होते, असे गढवालचे पोलीस महानिरीक्षक के. एस. नागन्याल यांनी सांगितले. वाहनामध्ये एकूण २६ जण होते आणि ते सर्व दिल्लीतील रहिवासी होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या सूचनेनुसार गंभीर जखमी झालेल्या सात पर्यटकांना हवाईमार्गे एम्समध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे, तर अन्य जखमींवर रुद्रप्रयाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला हा अपघात घडला आणि त्यानंतर राज्य आपत्कालीन प्रतिसाद दलाने तातडीने मदतकार्य सुरू केले. वाहन अलकनंदा नदीच्या तीरावर २५० फूट खोल दरीत कोसळले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुष्करसिंह धामी यांनीही शोक व्यक्त केला असून या अपघाताची जिल्हादंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था