राष्ट्रीय

भाजपला २१२० कोटी देणगी, काँग्रेसला मिळालेल्या रकमेपेक्षा सात पटीने अधिक रक्कम

Swapnil S

नवी दिल्ली :सत्ताधारी भाजपला २०२२-२३ या काळात निवडणूक रोख्यातून १३०० कोटी रुपये मिळाले आहेत. ही रक्कम काँग्रेसला मिळालेल्या रकमेपेक्षा सात पटीने अधिक आहे.

२०२२-२३ ला भाजपला २१२० कोटी रुपये देणगी मिळाली. त्यातील ६१ टक्के रक्कम ही निवडणूक रोख्यातून मिळाली. पक्षाने निवडणूक आयोगाकडे ही माहिती दिली आहे. २०२१-२२ मध्ये भाजपला १७७५ कोटी रुपये देणगी दिली होती, तर भाजपला २०२२-२३ मध्ये २३६०.८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. २०२१-२२ मध्ये भाजपला एकूण १९१७ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. भाजपला २०२२-२३ ला २३७ कोटी रुपये व्याज मिळाले, तर २०२१-२२ मध्ये भाजपला १३५ कोटी रुपये व्याज मिळाले होते. काँग्रेसला २०२२-२३ मध्ये १७१ कोटी रुपये निवडणूक रोख्यातून मिळाले, तर २०२१-२२ मध्ये २३६ कोटी रुपये निवडणूक रोख्यातून मिळाले. ‘सपा’ला निवडणूक रोख्यातून २०२१-२२ मध्ये ३.२ कोटी रुपये मिळाले होते. २०२२-२३ मध्ये त्यांना निवडणूक रोख्यातून काहीही उत्पन्न मिळाले नाही. तेलगू देसमला २०२२-२३ ला ३४ कोटी रुपये मिळाले.

२०२२-२३ मध्ये भाजपने निवडणुकीसाठी विमान व हेलिकॉप्टरसाठी ७८.२ कोटी रुपये खर्च केले. २०२१-२२ मध्ये ११७.४ कोटी रुपये भाजपने विमान व हेलिकॉप्टरसाठी खर्च केले.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार