राष्ट्रीय

काश्मीरमध्ये हाऊसबोटच्या आगीत ३ ठार

मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तिसऱ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

नवशक्ती Web Desk

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर शहरातील दल सरोवरात शनिवारी हाऊसबोटना आग लागून तीन जण होरपळून मरण पावले.

दल सरोवराच्या पर्यटन केंद्रात शनिवारी पहाटे आग लागली आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात पाच हाऊसबोट आणि त्यांना जोडलेल्या झोपड्या जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण लगेच समजू शकले नाही. शनिवारी पहाटे घाट क्रमांक नऊजवळ जळालेल्या अवस्थेतील तीन मृतदेह सापडले. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर तिसऱ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

TDR वापरला म्हणून जमिनीचे हस्तांतरण नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

वडोदरा-मुंबई टप्पा ३१ ऑगस्टपर्यंत खुला

'ऑथेंटिकेशन बायपास'बाबत सतर्क राहा! केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

Mumbai : मयंक लोहार हत्याकांडानंतर माहीममध्ये आणखी एका तरुणावर चाकूहल्ला; आरोपी फरार

मुंबई, ठाणे, पालघरला पुढील चार दिवस 'यलो अलर्ट'; २ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा; सातही धरणांतील पाणीसाठा खालावल्याने चिंता वाढली