राष्ट्रीय

काश्मीरमधील चकमकीत हिजबुलचे ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलाचे २ जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे पाच दहशतवादी ठार झाले असून, त्यामध्ये संघटनेच्या एका स्वयंघोषित कमांडरचाही समावेश आहे.

Swapnil S

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे पाच दहशतवादी ठार झाले असून, त्यामध्ये संघटनेच्या एका स्वयंघोषित कमांडरचाही समावेश आहे. या चकमकीत सुरक्षा दलांचे दोन कर्मचारीही जखमी झाले आहेत.

बेहीबाग परिसरात काही संशयित दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे वेढा घालून बुधवारी रात्री शोधमोहीम हाती घेतली होती. सुरक्षा दलांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने सुरक्षा दलांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत हिजबुलचा स्वयंघोषित कमांडर फारूक अहमद भट ऊर्फ नली याच्यासह पाच दहशतवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेल्या अन्य दहशतवाद्यांची नावे इरफान लोने, आदिल हुसेन, मुश्ताक इटू आणि यासिर जवैद अशी आहेत. या परिसरात सुरक्षा दलांकडून अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी चकमक स्थळी जाऊ नये, असे आवाहन सुरक्षा दलांनी केले आहे.

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल