राष्ट्रीय

आंध्रात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर ६ जण ठार, १० जखमी; मृतांचा आकडा वाढणार

नवशक्ती Web Desk

विशाखापट्टणम : विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन व विशाखापट्टणम-रायागडा पॅसेंजर ट्रेनमध्ये रविवारी रात्री टक्कर झाली. या अपघातात तीन डबे घसरले. या भीषण अपघातात ६ जण ठार तर १० प्रवासी जखमी झाले. या भीषण अपघातातील मृत व जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेल्वेने तातडीने बचाव व मदत कार्य सुरू केले.

ओव्हरहेड केबल तुटल्याने विशाखापट्टणम-रायगडा ट्रेन उभी होती. त्यावेळी पलासा एक्स्प्रेसने तिला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर तिचे तीन डबे रुळावरून घसरले. ईस्ट कोस्ट रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात ही घटना घडली.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक प्रशासन व एनडीआरएफच्या पथकांची मदत मागितली आहे. रुग्णवाहिका व अपघात मदत ट्रेन पाठवण्यात आली आहे. या अपघाताबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना धक्का बसला आहे. त्यांनी तातडीने मदत कार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विशाखापट्टणम व आनाकापल्ली येथून रुग्णवाहिका पाठवण्याचे आदेश दिले. तसेच रुग्णांना चांगले उपचार देण्यास सांगितले आहेत. जखमींना विजयनगरम सरकारी रुग्णालय व विशाखापट्टणम येथील रुग्णालयात पाठवले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस