प्रातिनिधिक छायाचित्र  
राष्ट्रीय

रेल्वे ऑनलाइन तिकीट आरक्षणासाठी आधार अधिप्रमाणीकरण अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून नियम लागू होणार

भारतीय रेल्वेने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) संकेतस्थळ व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन तिकिट आरक्षणासाठी बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या १५ मिनिटांत आधार अधिप्रमाणिकरण अनिवार्य केले आहे. हा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होईल.

Swapnil S

मुंबई : भारतीय रेल्वेने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) संकेतस्थळ व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन तिकिट आरक्षणासाठी बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या १५ मिनिटांत आधार अधिप्रमाणिकरण अनिवार्य केले आहे. हा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होईल.

ऑनलाइन तिकिट प्रणालीचा गैरवापर टाळण्यासाठी आयआरसीटीसीने हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या दिवशी आरक्षित तिकिटे बुक करण्यासाठी सामान्य आरक्षित तिकिटे उघडण्याच्या १० मिनिटांच्या मर्यादेच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. मात्र या दरम्यान भारतीय रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजंटना सुरुवातीच्या दिवशीची आरक्षित तिकिटे बुक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. संगणकीकृत पीआरएस काउंटरद्वारे सामान्य तिकिटांच्या बुकिंगमध्ये देखील कोणताही बदल होणार नाही.

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन