राष्ट्रीय

AAP in Gujrat Election: मी लिहून देतो, गुजरातमध्येही येणार 'आप'ची सत्ता; कोऱ्या कागदावर लिहून केली स्वाक्षरी

प्रतिनिधी

गुजरात निवडणूक अगदी काही दिवसांवर आल्या आहेत. (AAP in Gujrat Election) अशामध्ये आता सर्वच पक्षांची प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. यावेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा आम आदमी पक्षदेखील गुजरातच्या मैदानात उतरला आहे. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी, ही निवडणूक आम्हीच जिंकणार असा दावा केला आहे. एवढंच नव्हे तर, त्यांनी एका कोऱ्या कागदावर लिहून त्यावर स्वाक्षरी करून गुजरात जिंकण्याचा ठाम आत्मविश्वास व्यक्त केला.

अरविंद केजरीवाल यावेळी म्हंटले की,"दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी आप सरकार बनवेल, अशी भविष्यवाणी मी केली होती. पंजाब विधानसभेतदेखील सर्व दिग्गज पराभूत होऊन, आपच सरकार येईल असे सांगितले होते. त्यावेळी माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नव्हता. आताही मी भविष्यवाणी करतो की, गुजरातमध्ये २७ वर्षांच्या शासनाचा अंत होईल आणि यंदा आप सत्ता स्थापन करेल." यावेळी त्यांनी ही भविष्यवाणी एका कोऱ्या कागदावर लिहून स्वतःची स्वाक्षरी केली.

पुढे ते म्हणाले की, "गुजरात राज्य हे बदलाच्या प्रतीक्षेत आहे. गुजरातच्या सर्व नागरिकांमध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद आहे. ते 'आप'ला कौल देतील आणि २७ वर्षाचं दु:शासन हटवतील. भाजपचे मतदार 'आप'ला मतदान करतील. विश्वास बसत नसेल तर लिहून देतो. भाजप गुजरातवर अत्याचार करत आहे."

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!