राष्ट्रीय

आपची हरयाणात दुटप्पी भूमिका; विधानसभा स्वबळावर, तर लोकसभा इंडिया आघाडीतून लढणार

हरयाणा एक ‘मोठा बदल’ शोधत आहे कारण राज्यातील लोक येथे राज्य करणाऱ्या सर्व पक्षांना कंटाळले आहेत.

Swapnil S

चंदिगड : हरयाणातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व ९० जागा आम आदमी पक्ष (आप) स्वबळावर लढवील, असे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले. असे असले तरी लोकसभा निवडणुका या मात्र इंडिया आघाडीद्वारे लढवण्यात येतील, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होणार आहेत, तर विधानसभा निवडणुका या वर्षाच्या शेवटी सार्वत्रिक निवडणुकांनंतर काही महिन्यांनी होणार आहेत.

आज लोकांचा फक्त एका पक्षावर विश्वास आहे, तो म्हणजे आम आदमी पक्ष. एका बाजूला पंजाब आणि दुसरीकडे दिल्लीत आमचे सरकार आहे. आज हरयाणा मोठा बदल शोधत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये लोकांनी बदल केले. हा मोठा बदल पूर्वी आणि आता आहे. आता, तेथील लोक आनंदी आहेत, असेही केजरीवाल यांनी हरयाणात जिंद येथील त्यांच्या पक्षाच्या 'बदलाव जनसभे'मध्ये सांगितले. केजरीवाल म्हणाले की, हरयाणा एक ‘मोठा बदल’ शोधत आहे कारण राज्यातील लोक येथे राज्य करणाऱ्या सर्व पक्षांना कंटाळले आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी