अग्निवीरांचा डेटा विकण्याचा प्रयत्न; ५०० डॉलरसाठी १४ वर्षीय हॅकरचे कृत्य 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

अग्निवीरांचा डेटा विकण्याचा प्रयत्न; ५०० डॉलरसाठी १४ वर्षीय हॅकरचे कृत्य

जवळपास ४,००० अग्निवीरांचा संवेदनशील वैयक्तिक डेटा हॅक करून डार्क वेबवर ५०० अमेरिकी डॉलरला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरयाणातील वल्लभड येथील १४ वर्षीय मुलास दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : जवळपास ४,००० अग्निवीरांचा संवेदनशील वैयक्तिक डेटा हॅक करून डार्क वेबवर ५०० अमेरिकी डॉलरला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरयाणातील वल्लभड येथील १४ वर्षीय मुलास दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे.

अन्य माजी अग्निवीरांना सरकारी विभागांमध्ये रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी नोंदणी करता यावी, म्हणून तयार करण्यात आलेल्या चाचणी संकेतस्थळावर आरोपी मुलाने घुसखोरी केली. त्यानंतर त्याने माहिती मिळवून डार्क वेबवर सुमारे ४,००० अग्निवीरांचा डेटा असल्याची जाहिरात केली आणि तो ५०० डॉलरला विकण्याची तयारी दर्शविली होती. चौकशीनंतर आरोपी मुलाला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून, डेटा अन्य कोणाकडे पोहोचला का, याचा तपास सुरू आहे.

एआयचा वापर करून घुसखोरीचा संशय

या प्रकरणात आरोपीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केल्याचा संशय आहे. त्याने संकेतस्थळात नेमकी कशी घुसखोरी केली, याचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ पथकाने आरोपी मुलाच्या डिजिटल उपकरणांमधून डेटा हस्तगत केला आहे. तो खरा आहे का, याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अग्निवीरांची अधिकृत माहिती मागविण्यात आली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : शासकीय कर्मचाऱ्यांना घरदिलासा; वांद्रे, पवई, घाटकोपरला ५०० नवी सेवा निवासस्थाने

Mumbai : १० महिन्यांत ७ खून, उपनगरीय लोकलमध्ये हत्यासत्र; पश्चिम रेल्वेवर ५, तर मध्य रेल्वेवर २ घटना

Mumbai : पवई तलावावर देशातील सर्वांत भव्य म्युझिकल फाऊंटन; ३० कोटींच्या प्रकल्पाचे आज उद्घाटन, शिवरायांची शौर्यगाथा साकारणार

काँग्रेसच्या 'गरिबी हटाव'वर मोदींचा हल्लाबोल; केवळ १२ वर्षांत ५० कोटी लोक गरिबीमुक्त

तारळी प्रकल्पाला दणका; सावरघर येथील उत्खनन थांबविण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश