LinkedIn
राष्ट्रीय

AI नोकऱ्या हिरावून घेणार नाही! मायक्रोसॉफ्टचे पुनीत चंडोक यांची माहिती

कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्या काढून घेणार नाही, उलट ‘खरी पिंक स्लिप’ म्हणजे शिकण्यास नकार देणे, असे जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय कंपनी मायक्रोसॉफ्टचे भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष पुनीत चंडोक यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्या काढून घेणार नाही, उलट ‘खरी पिंक स्लिप’ म्हणजे शिकण्यास नकार देणे, असे जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय कंपनी मायक्रोसॉफ्टचे भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष पुनीत चंडोक यांनी सांगितले.

मायक्रोसॉफ्टच्या ‘एआय टूर’मधील भाषणात ते बोलत होते. या कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनीही भाषण केले.

ते म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्या हिरावून घेईल असे वाटत नाही. तर ते नोकऱ्यांचे विभाजन करेल. औद्योगिक काळातील शिक्षण घेऊन आयुष्यभर पैसे कमावण्याचा प्रथा आता मोडत आहे. तुम्ही आणि मी स्थिर, दीर्घकालीन करिअर असलेली शेवटची पिढी आहोत. आपली मुले एकाच वेळी अनेक गोष्टी करतील, असे त्यांनी सांगितले.

सतत शिकण्याच्या गरजेवर भर देताना चंडोक म्हणाले, ‘या नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता युगात खरी पिंक स्लिप म्हणजे ऑटोमेशन नाही. ज्याची आपल्याला भीती वाटते ते नाही. खरी पिंक स्लिप म्हणजे शिकण्यास नकार देणे होय. त्यामुळे नवनवीन गोष्टी शिकत राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शिकण्याची तुलना त्यांनी ऑक्सिजन मास्कशी केली.

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नाडेला म्हणाले की, ‘एआय’ च्या युगात डेटा हा कोणत्याही कंपनीचा सर्वात धोरणात्मक मालमत्ता असल्याचे सांगितले. हा डेटा ‘एआय’ सोबत सुसंगत पद्धतीने वापरायला हवा,” असे ते म्हणाले.

ते म्हणाले की महाराष्ट्र सरकार नागपूरमधील एका प्रकल्पांतर्गत सायबर सुरक्षेसाठी मायक्रोसॉफ्टचे ‘एआय’ सॉफ्टवेअर वापरत आहे आणि यामुळे सायबर गुन्हे तपासणीचा वेळ ८० टक्क्यांनी कमी झाला आहे. कंपनी अदानी सिमेंट, येस बँक, आदित्य बिर्ला ग्रुप या इतर ग्राहकांसोबतही ‘ए आय’ क्षेत्रात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार