(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंधनाच्या वाढत्या दरांमुळे अनेक फ्लाईट्स रद्द, 'या' मार्गांवर होणार परिणाम

वाढत्या इंधनखर्चामुळे काही निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांची वारंवारता कमी करण्यात आल्याचे कंपनीने मान्य केले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

वाढत्या जेट इंधन दरांचा फटका आणि पाकिस्तानच्या हवाई क्षेत्र बंदीमुळे वाढलेला खर्च यामुळे एअर इंडियाने काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांमध्ये तात्पुरती कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

जूनपासून पुढील तीन महिन्यांसाठी कपात

वाढत्या इंधनखर्चामुळे काही निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांची वारंवारता कमी करण्यात आल्याचे कंपनीने मान्य केले आहे. जूनपासून पुढील तीन महिन्यांसाठी ही तात्पुरती कपात लागू करण्यात आली आहे.

'या' शहरांवरील उड्डाणांवर परिणाम

माहितीनुसार, दिल्लीहून शिकागो, न्यूयार्क, सिंगापूर आणि शांघाय या शहरांसाठीची काही उड्डाणे तात्पुरती रद्द करण्यात आली आहेत. तसेच सॅन फ्रान्सिस्को, पॅरिस आणि टोरांटो मार्गांवरील उड्डाणांची संख्याही कमी करण्यात आली आहे. एअर इंडियाने दररोज सुमारे १०० उड्डाणांमध्ये कपात केल्याचे सांगितले जात आहे.

जेट इंधन दरवाढीचा मोठा परिणाम

जागतिक स्तरावर वाढलेल्या जेट इंधन दरांमुळे विमान कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. विमान कंपन्यांच्या एकूण कार्यकारी खर्चापैकी जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होत असल्याने नफ्यावर मोठा परिणाम होत आहे.

पाकिस्तान हवाई क्षेत्र बंदीमुळे वाढला खर्च

याशिवाय, पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या अनेक उड्डाणांना मोठे वळण घ्यावे लागत आहे. त्यामुळे इंधन वापर, विमान कर्मचाऱ्यांचा वेळ आणि तांत्रिक थांब्यांचा खर्च वाढल्याचे सांगितले जात आहे. काही उत्तर अमेरिकन उड्डाणांना व्हिएन्ना आणि स्टॉकहोम येथे तांत्रिक थांबे घ्यावे लागत आहेत.

पश्चिम आशियातील तणावाचाही परिणाम

पश्चिम आशियातील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर दबाव निर्माण झाला असून जेट इंधन दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 'द इकॉनॉमिक टाइम्स'च्या अहवालानुसार, मे २०२६ च्या पहिल्या आठवड्यात जागतिक जेट इंधनाचा सरासरी दर प्रति बॅरल १६२.८९ डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

विमान कंपन्यांच्या अडचणींकडे सरकारचे लक्ष

दरम्यान, वाढत्या इंधनखर्चाच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने नागरी विमान वाहतूक मंत्रालयालाही पत्र लिहून विमान कंपन्यांसमोरील अडचणींकडे लक्ष वेधले आहे.

'सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद' वृत्त फेटाळले

"जुलैपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत" या सोशल मीडियावरील वृत्तांना कंपनीने फेटाळले आहे.

एअर इंडियाने अधिकृत X हँडलवरून Fake News Alert जारी करत म्हटले की, "एअर इंडियाने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केल्याचे दावे पूर्णपणे खोटे, दिशाभूल करणारे आणि निराधार आहेत. प्रवाशांनी केवळ अधिकृत माध्यमांवरील माहितीवर विश्वास ठेवावा."

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद