नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने (कॉलेजियम) सोमवारी केंद्र सरकारकडे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल पंचोली यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली.
सरन्यायाधीश भूषण आर. गवई, न्या. सूर्यकांत, न्या. विक्रम नाथ, न्या. जे. के. महेश्वरी आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना आदी न्यायवृंदांची सोमवारी बैठक झाली.
यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने खालील उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली आहे : न्या. आलोक आराधे, मुख्य न्यायाधीश, बॉम्बे उच्च न्यायालय, न्या. विपुल मनुभाई पंचोली, मुख्य न्यायाधीश, पाटणा उच्च न्यायालय असे निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले.