सियांग धरणग्रस्तांशी संवादसेतू; चिंता दूर करण्याची अमित शहा यांची ग्वाही ANI
राष्ट्रीय

सियांग धरणग्रस्तांशी संवादसेतू; चिंता दूर करण्याची अमित शहा यांची ग्वाही

अरुणाचल प्रदेशातील सियांग खोऱ्यात प्रस्तावित ११,२०० मेगावॉटच्या सियांग अपर मल्टिपर्पज (एसयूएमपी) प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांची चिंता संवादातून दूर केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिली.

Swapnil S

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील सियांग खोऱ्यात प्रस्तावित ११,२०० मेगावॉटच्या सियांग अपर मल्टिपर्पज (एसयूएमपी) प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांची चिंता संवादातून दूर केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिली. प्रकल्प राबविताना स्थानिक संस्कृती, परंपरा आणि धार्मिक श्रद्धांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बंदरदेवा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात शहा यांनी सियांग खोऱ्यातील नागरिकांच्या भावना आणि शंका आपण समजून घेतल्या असल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांनी राज्य सरकारशी चर्चा करून आपल्या समस्या मांडाव्यात. राज्य प्रशासनामार्फत केंद्रीय गृह मंत्रालयापर्यंत आपले म्हणणे पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले.

काश्मीरमध्ये एकही स्थानिक दहशतवादी शिल्लक नाही

बंदरदेवा : काश्मीर खोऱ्यात आता एकही स्थानिक दहशतवादी शिल्लक नसल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला. पुलवामामध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याने, आता या भागात सक्रिय असलेले दहशतवादी विदेशी असल्याचे त्यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशातील बंदरदेवा येथे आयोजित राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान सोहळ्यात शहा बोलत होते.

Mumbai : शासकीय कर्मचाऱ्यांना घरदिलासा; वांद्रे, पवई, घाटकोपरला ५०० नवी सेवा निवासस्थाने

Mumbai : १० महिन्यांत ७ खून, उपनगरीय लोकलमध्ये हत्यासत्र; पश्चिम रेल्वेवर ५, तर मध्य रेल्वेवर २ घटना

Mumbai : पवई तलावावर देशातील सर्वांत भव्य म्युझिकल फाऊंटन; ३० कोटींच्या प्रकल्पाचे आज उद्घाटन, शिवरायांची शौर्यगाथा साकारणार

काँग्रेसच्या 'गरिबी हटाव'वर मोदींचा हल्लाबोल; केवळ १२ वर्षांत ५० कोटी लोक गरिबीमुक्त

तारळी प्रकल्पाला दणका; सावरघर येथील उत्खनन थांबविण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश