अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला : गोळीबारात एका पोलिसाला वीरमरण X
राष्ट्रीय

अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला : गोळीबारात एका पोलिसाला वीरमरण

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग शहरात बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास अनंतनाग येथील लाल चौकात दहशतवाद्यांनी हा गोळीबार केला.

Swapnil S

श्रीनगर : पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग शहरात बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास अनंतनाग येथील लाल चौकात दहशतवाद्यांनी हा गोळीबार केला.

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी हुसेन यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट'ने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीजीपी नलीन प्रभात यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

उपराज्यपालांकडून निषेध

या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी, "हे निर्घृण कृत्य करणाऱ्या दोषींची कोणत्याही स्थितीत गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. मी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२