राष्ट्रीय

विधानसभा पोटनिवडणुकीत संमिश्र निकाल; काँग्रेसला राजस्थान, तेलंगणात यश

सात राज्यांमधील आठ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले असून सर्वच पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : सात राज्यांमधील आठ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले असून सर्वच पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे.

राजस्थानमधील अंता विधानसभेची जागा काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रमोद जैन भाया हे येथे विजयी झाले आहेत. तसेच तेलंगणातील ज्युबिली हिल्स जागेवरही काँग्रेसने विजय मिळवला आहे. ही जागा पूर्वी माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या ‘बीआरएस’कडे होती.

पंजाबमधील तरनतारनची जागा राखण्यात ‘आप’ला यश मिळाले आहे. तर मिझोराममधील दाम्पा येथे मिझो राष्ट्रीय आघाडीने (एमएनएफ) विजय मिळवला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील नागरोटा येथे भाजप उमेदवाराने विजय मिळवला, तर बडगाममध्ये मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपीने विजय मिळवला.

ओडिशातील नुआपाडा येथे भाजपने विजय मिळवला, तर झारखंडमधील घाटसिला जागेवर झामुमो उमेदवार सोमेश चंद्र सोरेन यांनी माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचे पुत्र भाजप उमेदवार बाबूलाल सोरेन यांचा पराभव केला. मिझोराममध्ये एमएनएफचे डॉ. आर. लालथांगलियाना यांनी डम्पा विधानसभा जागा जिंकली. डॉ. आर. लालथांगलियाना यांनी ६,९८१ मते मिळवून ५६२ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब

शक्तीपीठ महामार्गाला ६ तालुके ६१ गावांचा विरोध कायम; कोल्हापूरमधून जाणारा ११० किमी अंतराचा रस्ता वादामुळे रखडला