Photo : X
राष्ट्रीय

एअर इंडिया एक्स्प्रेस विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न, ९ जण ताब्यात

बंगळुरु–वाराणसी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात एका प्रवाशाने योग्य पासकोड टाकून कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. हायजॅकचा संशय आल्यानं कॅप्टनने दार न उघडता सतर्कता दाखवली आणि मोठी घटना टळली. या प्रवाशासह त्याचे आठ सहकारी ‘सीआयएसएफ’च्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Swapnil S

वाराणसी : बंगळुरुहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात एका प्रवाशाने अचानक कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे विमानात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे त्या प्रवाशाने योग्य पासकोडही टाकला होता, पण हायजॅक होण्याच्या भीतीने कॅप्टनने दार उघडले नाही. हा प्रवासी आपल्या आठ सहकाऱ्यांसोबत प्रवास करत होता. या घटनेनंतर सर्व ९ जणांना ‘सीआयएसएफ’च्या ताब्यात देण्यात आले. या प्रवाशाने विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. मात्र, पायलटने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली आहे.

एअर इंडियाने या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, संबधित प्रवासी शौचालयाला जाण्याच्या बहाण्याने कॉकपिटजवळ गेला आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. आम्ही सर्वांना खात्री देऊ इच्छितो की, विमानात कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लँडिंगनंतर तत्काळ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

हा आठवडा निर्णायक! शेअर बाजाराची नेमकी दिशा ठरणार; सोने-चांदी दराची कसोटी लागणार

मुंबईत तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस

Mumbai : आनंदोत्सवाला लोटला तरुणाईचा जनसागर! 'रंग दे बसंती', 'वंदे मातरम' या गाण्यांवर थिरकले झेन-झी

महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार; पुलाचे काम ९० टक्के पूर्ण

मीराबाईची सोनेरी हॅटट्रिक! राष्ट्रकुलमध्ये सलग तिसरे सुवर्ण जिंकणारी भारताची पहिली वेटलिफ्टर