राष्ट्रीय

लोकांना कुत्र्यासारखे मारा! मंत्री अब्दुल सत्तार यांचे वादग्रस्त आदेश

गर्दीला शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर लाठीजार्चचे आदेश दिले.

Swapnil S

सिल्लोड : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका डान्स शोमध्ये लोकांना कुत्र्यासारखे मारा, असे आदेश पोलिसांना दिले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचा व्हिडीओ ‘एक्स’वर टाकला आहे.

या व्हिडीओत सत्तार म्हणाले की, लोकांना कुत्र्यासारखे मारा. इतका लाठीचार्ज करा की, त्यांची कंबर तुटली पाहिजे. या व्हिडीओवर सर्वत्र टीका केली जात आहे. वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीची संस्कृती बोलायचे एक आणि करायचे दुसरेच, अशी आहे. महायुती सरकारचा खरा चेहरा समोर आणल्याबद्दल अब्दुल सत्तार यांना धन्यवाद. सत्तार हे पोलिसांना आपल्या टोळीतील गुंड मानतात. सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी काही तरुण हुल्लड घालू लागले. आयोजकांनी त्यांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. तरीही युवक शांत झाले नाहीत. त्यामुळे सत्तार यांना राग आला.

त्यांनी गर्दीला शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर लाठीजार्चचे आदेश दिले. एक हजार पोलिसांना, ५० हजार नागरिकांना तुरुंगात टाकण्यात काय अडचण आहे, असे म्हणाले.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा