'बाथरूम वापरायचं आहे' म्हणत जबरदस्ती घरात घुसला; महिलेसमोर डिलिव्हरी बॉयचे अश्लील कृत्य, VIDEO 
राष्ट्रीय

'बाथरूम वापरायचं आहे' म्हणत जबरदस्ती घरात घुसला; महिलेसमोर डिलिव्हरी बॉयचे अश्लील कृत्य, VIDEO

बंगळुरूमध्ये पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने शौचालय वापरण्याच्या बहाण्याने घरात जबरदस्तीने प्रवेश करून महिलेसमोर अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Mayuri Gawade

बंगळुरूमध्ये एका महिलेने एका डिलिव्हरी एजंटवर गंभीर आरोप केले आहेत. पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने शौचालय वापरण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि त्यानंतर महिलेसमोर अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ संबंधित महिलेने सोशल मीडियावर शेअर केला असून, प्रकरणाची दखल घेत बंगळुरू पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

महिलेने वारंवार नकार दिल्यानंतरही घरात प्रवेश

महिलेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, संबधित डिलिव्हरी एजंट पार्सल देण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने शौचालय वापरण्याची परवानगी मागितली. मात्र, अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देत नसल्याचे सांगत महिलेने त्याला अनेकदा नकार दिला.

तिने त्याला शेजारी राहणाऱ्या पुरुषांकडे मदत मागण्याचाही सल्ला दिला. मात्र, तिच्या म्हणण्यानुसार, डिलिव्हरी एजंटने तिचा नकार दुर्लक्षित करून जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि शौचालयाचा वापर केला.

बाहेर आल्यानंतर अश्लील कृत्य केल्याचा आरोप

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती शौचालयातून बाहेर येताना दिसतो. त्यानंतर त्याने महिलेसमोर आपले गुप्तांग उघड केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

यामुळे संतप्त झालेली महिला त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा देते. त्यानंतर ती त्याच्या मागे घराबाहेर आणि लिफ्टपर्यंत जात त्याला जाब विचारताना व्हिडिओमध्ये दिसते.

'मी खूप घाबरले होते'

या घटनेमुळे आपण प्रचंड घाबरल्याचे महिलेने सांगितले. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिने मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवला, घराचा मुख्य दरवाजा उघडाच ठेवला आणि गरज पडल्यास बाहेर पळता यावे म्हणून ती दरवाज्याजवळच उभी राहिली होती.

महिलेने सांगितले की, महिलांविरोधातील वाढत्या गुन्ह्यांच्या घटना पाहता आपण सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, या घटनेमुळे स्वतःच्या घरातही असुरक्षित वाटल्याचे तिने म्हटले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

महिलेची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी त्यावर प्रतिक्रिया देत, "घटना नेमकी कुठे घडली आणि तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला डायरेक्ट मेसेजद्वारे पाठवा," असे आवाहन केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल