"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" वर्गात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनीचे गंभीर आरोप, VIDEO 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" वर्गात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनीचे गंभीर आरोप, VIDEO

मध्य प्रदेशातील भिंडमध्ये सरकारी शाळेतील शिक्षकावर विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. "शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" असा सवाल विद्यार्थिनीने केला असून, शिक्षक वर्गात मोबाईलवर गेम खेळत असल्याचाही आरोप आहे. घटनेचा VIDEO समोर आला आहे.

Mayuri Gawade

विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी वर्गात मोबाईलवर गेम खेळणे आणि विद्यार्थिनींकडे त्यांचे इंस्टाग्राम आयडी मागणे एका सरकारी शिक्षकाला चांगलेच अडचणीत आणू शकते. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील सरकारी शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षकावर हे गंभीर आरोप केले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये एक विद्यार्थिनी शिक्षकाविरोधात आरोप करताना दिसत आहे. विद्यार्थिनी आणि पालकांच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला. मात्र, याप्रकरणी अधिकृत चौकशी किंवा कारवाईबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा प्रकार भिंड जिल्ह्यातील नयागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोट गावातील शासकीय हायस्कूलमध्ये घडला. विद्यार्थिनींनी संबंधित शिक्षकाचे नाव प्रशांत असल्याचे सांगितले आहे. प्रशांत सर वर्गात शिकवण्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी केला.

"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?"

माध्यमांशी बोलताना एका विद्यार्थिनीने शिक्षकावर थेट आरोप केले. "एक शिक्षक आम्हाला शिकवत नाहीत. उलट शाळेत येऊन मुलींचे इंस्टाग्राम आयडी मागतात. ते इथे शिकवायला येतात की मुलींचे इंस्टाग्राम आयडी मागायला?" असा सवाल विद्यार्थिनीने केला.

विद्यार्थिनीला संबंधित शिक्षकाचे नाव विचारण्यात आले असता तिने 'प्रशांत सर' असे उत्तर दिले.

वर्गात मोबाईलवर गेम खेळल्याचा आरोप

विद्यार्थिनीने शिक्षकाच्या वर्गातील वागणुकीबाबतही आरोप केले आहेत. शिक्षक वर्गात शिकवण्याऐवजी मोबाईलवर पत्त्यांचे आणि इतर गेम खेळत असल्याचे तिने सांगितले.

"शिकवत नसाल तर निदान विद्यार्थ्यांशी नीट बोला. तेही महत्त्वाचे आहे. सर मोबाईलवर पत्ते आणि इतर गेम खेळतात. मुलांना शिकवत नाहीत. टेबलवर पाय ठेवून गेम खेळत बसतात," असा आरोप विद्यार्थिनीने केला.

पत्रकारांच्या प्रश्नांवर शिक्षक मौन

विद्यार्थिनींच्या आरोपानंतर पत्रकारांनी संबंधित शिक्षकाला याबाबत प्रश्न विचारले. मात्र, शिक्षकाने या आरोपांवर कोणतेही उत्तर दिले नाही. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरही ते मौन राहिले.

विद्यार्थिनी आणि पालकांच्या तक्रारींमुळे हा प्रकार समोर आल्यानंतर शाळेतील शिस्त आणि अध्यापनाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित शिक्षकावरील आरोपांची अधिकृत चौकशी होणार का आणि शिक्षण विभागाकडून त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार का, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाण्यात खळबळ! ठाकरेंच्या नेत्याची निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

महाराष्ट्रासह ५ राज्यांना दुष्काळाचा विळखा; केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती

Mumabi : तीन वर्षांनी प्रशासनाला जाग, EUS मशीन खरेदीचा ठराव गुंडाळणार, स्थायी समितीने २०२३ साली दिली होती मंजुरी