राष्ट्रीय

सायरस मिस्त्री यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका

वृत्तसंस्था

सायरस मिस्त्री यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला. खरेतर, सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून हटवण्याच्या २०२१ च्या निर्णयाचे पुनरावलोकन आणि पुनर्विचार करण्याची मागणी करणारी एसपी ग्रुपची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. टाटा समूहासोबतच्या वादाच्या संदर्भात ही पुनर्विलोकन याचिका न्यायाधीशांनी फेटाळून लावली.

टाटा-मिस्त्री वादाच्या बाबतीत, न्यायालयाने आपल्या मार्च २०२१च्या निकालात सायरस मिस्त्री यांच्या विरोधात केलेल्या काही टिप्पण्या काढून टाकण्याचे आदेश दिले. पुनर्विलोकन याचिकेत कोणतेही कारण सापडले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यावर चेंबरमध्ये विचार केला, तरीही न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांनी अल्पमतातील निकालात पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली. २६ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने टाटा समूहाच्या बाजूने निर्णय देताना सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून हटवण्याचा निर्णय कायम ठेवला.

मुंबईत घरांवर पहिला हक्क मराठी माणसाचा! घर नाकारणाऱ्या बिल्डरवर होणार कारवाई; शंभूराज देसाई यांची घोषणा

अचानक हार्ट अटॅकची भीती; कर्नाटकमध्ये रुग्णालयांत लोकांची प्रचंड गर्दी, घाबरू नका - डॉक्टरांचे आवाहन

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा